शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified गुरूवार, 9 जून 2022 (20:37 IST)

कसोटीवर खरी उतरून टिकते तीच खरी मैत्री!!!

friendship
सर्व दुःखात साथ देणारी मैत्री,
प्रत्येक वेळी, वेळेत धावून येणारी मैत्री,
चांगला सल्लागार होतो फक्त मैत्री,
ज्याची लाज आपल्यास वाटत नाही ती मैत्री,
अधिक उणे कधीच बघत नाही ती मैत्री,
जसा आहे तसा स्वीकारायला तयार मैत्री,
मन मोकळं करता येतं जिथं ती मैत्री,
वेळीच कानउघाडणी करणारी असावी मौत्री,
आपलं म्हणून वावरता येतं तिथं, ती असते मैत्री,
वेळेचं भान न ठेवता भेटता येणं, म्हणजे मैत्री,
आपल्या जवळ नसतानाही, द्यायची तयारी असणं म्हणजे मैत्री,
वयाचं बंधन नसणारी, असते मैत्री,
कोणत्याही कुंपणात न बांधणारी असावी मैत्री,
....अश्याच अनेक कसोटीवर खरी उतरून टिकते तीच खरी मैत्री!!!
...अश्विनी थत्ते