1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : गुरूवार, 17 जून 2021 (10:24 IST)

आयुष्यात भेटणारं कोणीच अकारण भेटत नसतं

आयुष्यात भेटणारं कोणीच 
अकारण भेटत नसतं
 
विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं
आयुष्यातलं ते एक पान असतं
 
भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून
काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं
 
म्हणूनच बहुदा त्याने दोघांच्या 
भेटीचं नाट्य घडवून आणलेलं असतं
 
मित्र असोत वा शत्रू
प्रत्येक जण जणू एक पुस्तक असतं
 
ते कसं वाचायचं हे प्रत्येकाने
आपापलं ठरवायचं असतं
 
शंभर टक्के चांगलं किंवा 
शंभर टक्के वाईट कोणीच नसतं 
 
प्रत्येकात चांगलं असं
काही ना काही दडलेलंच असतं
 
त्यातलं चांगलं ते अधिक 
आणि वाईट ते उणे करायचं असतं
 
"मीपण" पूर्ण वजा करून
"माणूसपण" तेवढं जमा ठेवायचं असतं
 
स्वतःसाठी जगताना  दुसऱ्यासाठीही
जगता येतं का पाहायचं असतं
 
कोणासाठी आधारवड तर कोणासाठी
श्रावणधारा होऊन बरसायचं असतं
 
म्हणून मला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात
माझ्यासाठी इवलासा कोपरा असू दे
 
त्यांच्याही आयुष्यात विधात्याने लिहिलेलं
माझ्या नावचं फक्त एक पान असू दे!

- Soial Media