संबंधित माहिती
- इतके मला पुरे आहे
- ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन
- विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कलाकृतींना हजारो रसिकांकडून मिळाली दाद
- मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा, वेदनांची मांडणी व्हावी
- अमळनेर : विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला ‘नली’ नाटकाचा प्रयोग
पावसाळी कविता: काल अनुभवला एक पाऊस
काल अनुभवला एक पाऊस, भिजवून गेला,
तना पेक्षा मनांत आंत तो ओला वून गेला,
हिरव्यागार पानांत, हरवलं माझं मन,
खळबळ वाहणाऱ्या ओढ्यातून वाहून गेलं आपणहून,
धरित्री ही नटली होती, काय सौंदर्य वर्णाव,
बाहेर निघाल्या खेरीज, कसं बरं दिसावं?
एक आगळा गंध होता सर्वदूर पसरलेला,
मनसोक्त बरसला होता "तो",अन वेड लावून गेला.
थंडगार वारं, अंगाशी खेळत होत अवखळ,
ऐकू येत होती कानी, पानांची सळसळ,
एक रम्य आठवण घेऊन परतले घरी,
माझ्या मनात मात्र कोसळत होत्या पावसाच्या सरी!!
..अश्विनी थत्ते
