रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 28 जुलै 2024 (07:50 IST)

विड्याच्या पानापासून बनवा मुखवास, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

vida
पूजा, शुभ कार्याला विड्याच्या पानाला विशेष मान दिला जातो. विड्याचे पान हे आरोग्यासाठी देखील चांगले असते. तुम्ही विड्याच्या पानाचे आइसक्रीम, ठंडाई सोबत अनेक वस्तू खाल्ल्या असतील किंवा सेवन प्यायल्या असतील. पण, तुम्ही कधी विड्याच्या पानापासून स्वादिष्ट आणि सुगंधी पान मुखवास खाल्ले आहे का? तर चला आज आपण पाहणार आहोत की विड्याच्या पानापासून मुखवास कसा तयार करावा.  
 
साहित्य-
विड्याचे पान - 10 ते12
गुलकंद - 2 ते 3 मोठे चमचे 
शोप- 1 मोठा चमचा 
खोबऱ्याचा किस - 2 मोठे चमचे 
गोड सुपारी- 1 मोठा चमचा 
मिश्री - 2 मोठे चमचे 
वेलची पूड 
टूटी फ्रूटी- 3 ते 4 चमचे 
 
कृती-
सर्वात आधी विड्याचे पान धुवून घ्यावे.
पानांची मागील दांडी काढून छोटे छोटे तुकडे करून घ्यावे.
आता एका बाऊलमध्ये गुलकंद घालून त्यामध्ये वेलची पूड घालावी.
आता या मध्ये शोप, नारळाचा किस,टुटी फ्रूटी आणि मिश्री मिक्स करावी.
आता विड्याच्या पानांना गुलकंद मध्ये मिक्स करावे. 
आता हे सर्व मिश्रण जर तुम्हाला मध्यम बारीक हवे असेल तर मिक्सरमधून काढून घ्यावे. 
तयार मुखवासाला एयरटाइट कंटेनर किंवा काचेच्या जार मध्ये भरावा. 
तसेच फ्रिजमध्ये स्टोर करावे जेणेकरून फ्रेश राहील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik