रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चविष्ट पुदीना छोले रेसिपी

chhole
छोलेची भाजी सर्वांनाच आवडते. पण आपण आज नवीन रेसिपी पाहणार आहोत ज्याचे नाव आहे पुदिना छोले. चला तर लिहून घ्या पुदिना छोले रेसिपी. 
 
साहित्य-
छोले- 250 ग्रॅम 
पुदीना- अर्धा कप (प्यूरी)
कांदा - 3 कापलेला 
टोमॅटो- 5 कापलेले 
मुळा- अर्धा कापलेला 
छोले मसाला- 3 चमचे 
लाल तिखट - 2 चमचे 
धणे पूड- 1 चमचे 
कढी पत्ता - 2 
चहा पावडरचे पाणी- 1 कप
हिरवी मिरची- 4 कापलेली 
जिरे- अर्धा चमचे 
कोथिंबीर 
 
कृती-
एका पातेलीत छोले घेऊन ते धुवून घ्यावे आणि आठ तासांकरिता भिजत घालावे. आता हे भिजवलेले छोले कुकरमध्ये वाफवून घ्यावे.तसेच पातेलीमध्ये एक कप पाणी घालून चहा पावडर टाकून उकळून घ्या. आता कढईमध्ये तेल गरम करून जिरे व कढीपत्ता घालावा. तिखट, धणेपूड, मीठ घालावे. यानंतर यामध्ये पुदिना पेस्ट व मुळा आणि छोले घालावे. आता चहा पावडरचे पाणी आणि मिरची घालावी. तसेच हे मिश्रण शिजू द्यावे. यानंतर यावर कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपले पुदिना छोले. हे भात किंवा भटुरे सॊबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik