संबंधित माहिती
- महाराष्ट्र मॉन्सून अपडेट: मुंबईत पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, 13 राज्यांनी यलो अलर्ट जारी केला
- Mumbai rains : राज्यात पुढचे 4 दिवस धुवाँधार पावसाचा अंदाज
- 8 जून : 'World Brain Tumor Dayलक्षण आणि उपचार पद्धती जाणून घ्या
- राज्यात अतिवृष्टीचा इशारा, मुंबई महानगरपालिका सज्ज
- येत्या ९ ते १२ जून काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा
नको नको रे पावसा
नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;
नको नाचूं तडातडा
असा कौलारावरुन,
तांबे सतेलीपातेलीं
आणू भांडी मी कोठून?
नको करु झोंबाझोंबी
माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ
अशी मातीत लोटून;
आडदांडा नको येउं
झेपावत दारांतून,
माझे नेसूचे जुनेर
नको टांकू भिजवून;
किती सोसले मी तुझे
माझे एवढे ऐक ना,
वाटेवरी माझा सखा
त्याला माघारी आण ना;
वेशीपुढे आठ कोस
जा रे आडवा धावत,
विजेबा, कडाडून
मागे फिरव पंथस्थ;
आणि पावसा राजसा
नीट आण सांभाळून,
घाल कितीही धिंगाणा
मग मुळी न बोलेन;
पितळेची लोटीवाटी
तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत
तुझ्या विजेला पूजीन;
नको नको रे पावसा
असा अवेळी धिंगाणा
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली….
– इंदिरा संत
पुढील लेख
