राज्यात अतिवृष्टीचा इशारा, मुंबई महानगरपालिका सज्ज

rain
Last Modified सोमवार, 7 जून 2021 (18:22 IST)
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात येत्या ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे. परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच या काळात कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.
हे लक्षात घेत मुंबई महानगरपालिका अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी सज्ज असून महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापालिकेच्या तयारीची माहिती दिली. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला.

मुंबईतील नाल्यांची केलेली स्वच्छतेची कामे, नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण याची माहिती देण्यात आली. तसेच पाणी साचेल अशी शक्यता असलेल्या ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आल्याचे तसेच अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी ज्युनिअर इंजिनिअर स्पॉटवर राहून पाणी निचऱ्याचे काम करतील असेही चहल यांनी सांगितले.
अलीकडेच हिंदमाताच्या परिसरात दोन मोठे टँक केले असून यामध्ये साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था केली गेली आहे. तसेच पालिका क्षेत्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनला निधी देऊन स्कॉड तयार करण्यात आले आहे. हे स्कॉड वॉर्डमधील अडचणींचे निवारण करतील. झाडं पडल्यास हटवणे, रस्ते वाहतूकीसाठी मोकळे करणे या जबावदार्‍या पार पाडतील. तसेच प्रत्येक वार्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या आल्या असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरीत करता येईल. एनजीओच्या मदतीने स्थलांतरीत लोकांच्या जेवणाची व्यवस्था देखील केल्याची माहिती चहल यांनी दिली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांना विभागातील इतर महानगरपालिका आयुक्त, जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिवृष्टीच्या काळात करण्यात येणार असलेल्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेतला. धोकादायक इमारती, दरडग्रस्त भागातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षितस्थळी हलवावे असेही आदेश देण्यात आले आहेत.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

IND vs PAK : बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियांदाद यांच्या ...

IND vs PAK : बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियांदाद यांच्या भेटीत काय घडलं होतं?
भारत-पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधांमुळे शिवसेनेने नेहमीच पाकिस्तानच्या भारत ...

पाकिस्तान विरुद्धची मॅच आणि कर्णधारपदाबाबत काय म्हणाला ...

पाकिस्तान विरुद्धची मॅच आणि कर्णधारपदाबाबत काय म्हणाला विराट?
भारत पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात मैदानावर भारतीय संघ चांगली ...

चार मुलांना विष देऊन माजी सैनिकाची आत्महत्या

चार मुलांना विष देऊन माजी सैनिकाची आत्महत्या
एका माजी सैनिक पित्याने चार मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली ...

...म्हणून सरकारला पेट्रोल-डिझेलवरचा टॅक्स हटवणं अशक्य - ...

...म्हणून सरकारला पेट्रोल-डिझेलवरचा टॅक्स हटवणं अशक्य - बाबा रामदेव
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पण योगगुरू बाबा रामदेव यांनी या मुद्द्यावरून केंद्र ...

'म्हणूनच तुम्हाला मास्क घालायला सांगितलं होतं'

'म्हणूनच तुम्हाला मास्क घालायला सांगितलं होतं'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती ...