गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (12:12 IST)

मित्र म्हणजे एक असा, की वाटेल ते बोला

मित्र म्हणजे एक असा, की वाटेल ते बोला,
कित्ती ही राग आला तरी, आतून ओला,
कोणते ही सोंग घ्यावं लागतच नाही त्याच्यासमोर,
आपण नक्की काय आहे, तोच ओळखतो खरोखर,
गरीबी असली तरी मैत्रीत काही फरक पडत नाही,
श्रीमंतीत तीचा माज काही होतं नाही,
लोणचं आहे मैत्री म्हणजे जितकं मुरल तितकी छान,
द्यावा घ्यावा लागत नाही हो फुकटचा मान पान,
प्रसंग असो कित्ती ही बाका, आलेला आयुष्यात,
एक मित्र क्षणात मिटवतो सारी चिंता क्षणार्धात,
जादूची कांडी असते हो मित्र म्हणजे मिळालेली,
करत जावी जादू सतत, खुशी परत मिळवावी परत गेलेली!!
....अश्विनी थत्ते.