शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (16:01 IST)

एवढे लक्षात ठेवा.

उंची नं आपुली वाढते फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा.

ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी, ती न कमी अपुल्या एवढे लक्षात ठेवा.

जाणते जे संगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र ती ही माणसे एवढे लक्षात ठेवा.

चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा.

विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा.

दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरूचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा.

माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतः ला जिंकणे एवढे लक्षात ठेवा.
 
- विं. दा. करंदीकर.