मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (09:50 IST)

मुलांना घरात व्यस्त ठेवण्यासाठी हे करा

सध्या लॉकडाऊन मुळे मुलं घरीच आहे. घरात राहून त्यांनी उच्छाद मांडला. आहे. ते खूप मस्ती करतात आणि धुडगूस घालतात.त्यामुळे त्यांना व्यस्त कसे ठेवता येईल हा मोठाच प्रश्न आहे. यासाठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण मुलांना व्यस्त ठेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* चित्रकारी करू द्या- 
मुलांना ड्रॉईंग करायला खूप आवडते त्यांना ड्रॉईंगच्या नवीन पुस्तके आणून द्या. त्यांना बबल पेंटिंग, स्प्रे पेंटिंग शिकवा. या मुळे त्यांच्या क्रियात्मकतेला प्रोत्साहन मिळेल.  
 
* बाग काम करू द्या- 
त्यांना बागेचे काही काम शिकवा जेणे करून त्यांना झाडांचे महत्त्व कळेल आणि ते झाडाची जोपासना करू लागतील. त्यांना झाडाच्या महत्त्वा विषयी सांगा.  
 
* पझल गेम-
सध्या त्यांना घरात असल्यामुळे मेंदूला चालना मिळत नाही. त्या साठी त्याच्या मेंदूला चालना मिळण्यासाठी पझल गेम खेळू द्या.असं केल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होते. 
 
*कुकिंग -
जरी मुलगा असेल तरीही त्याला कुकिंग शिकवा. जेणे करून मुलं काम निमित्त बाहेर गेल्यावर जेवणाची आबाळ होऊ नये.  
 
* एखादे वाद्य शिकवा- 
मुलाला वाद्याची आवड असेल तर आपण त्याला एखादे वाद्य देखील शिकवू शकता. आपण त्याला एकाद्या संगीत वर्गामध्ये देखील पाठवू शकता. जेणे करून त्यांच्या मध्ये कलात्मक गुणांची वाढ होईल.