शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (22:33 IST)

New Year बघता बघता याही वर्षाचा शेवट आला

बघता बघता याही वर्षाचा शेवट आला,
त्यासोबतच या वर्षाच्या सर्वच तंटा संपला,
कडूगोड आठवणी जमविल्यात प्रत्येकाने,
लागला सरसावून कामाला नवीन धडाडीने,
हे ही वर्ष बसेल घडी करून आठवणी च्या कपाटात,
जेंव्हा कधी उलगडून बघू, राहील स्मरणात,
पण शेवटी प्रत्येकास असं वाटतं की लगेचच संपलं हे वर्ष,
नवीन काही चांगलं घेऊन येईलच येणारा काळ, हा हर्ष,
असो हे तर  सदाच  होतच राहणार, 
काळाची पावलं वेगानं असेच पडणार!
होवोत प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण देवा!
येणाऱ्या काळाचा प्रवास सर्वांचा सुखाचा व्हावा!
...अश्विनी थत्ते