"जागतीक चिमणी दिवसा निमित्ताने"!
लहानपणी ऐकल्या गोष्ट काऊ-चिऊ ची,
घासातला घास खाऊ घालायची मुलं तेव्हाची,
आई निवडायची अंगणात धान्य बसून,
चिऊताई येई हळूच, उडून जाई दाणा घेऊन,
प्रत्येक घरात लाईट भोवती घरटं चिऊच,
बाळाच्या वरण-भाताचं शीत तिच्या हक्काचं,
अंगणात झाडावर येई ऐकू किलबिलाट तिचा,
चिऊताई म्हणजे विषयचं होता जिव्हाळ्याचा,
आता मात्र रुसली "ती"माणसाच्या जगाला,
दूर केलं तिने, आपल्या घरट्याला,
येईनाशी झाली ती घराघरातून आपुल्या,
बाळाचा घास अडकला, घरात बसल्या,
जागे व्हा माणसांनो, करू नका घोडचूक,
विना चिवचिवाट आपलं आयुष्य होईल मुकं,
पुढं करा हात मदतीचा,थोडे प्रयत्न करा,
अंगणी येईल बरें चिऊ,मगच चिमणी दिवस साजरा करा!!
"जागतीक चिमणी दिवसा निमित्ताने"!
अश्विनी थत्ते.