गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (14:54 IST)

किती देखणी असतात ना आपली नाती

टोमण्याकडे दुर्लक्ष करून कौतुक करणारी आई
घोडा घोडा करणारे बाबा
बाळाला मांडीवर घेऊन बसणारी आत्या
न रागावता लाड करणारी मावशी
'मुलीला मांडवात घेऊन या' चा पुकारा झाल्यावर डोळे भरून येणारे मामा
माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत भरल्या आवाजात 'येत जा गं घरी' म्हणणारी काकू
नि गाडी वरून फिरवायला नेणारा काका
सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी मैत्रिण
 
आणि बाकी काही तक्रार नाही हो पण फार कमी जेवते तुमची मुलगी '
असं फोनवर सांगणारी प्रेमळ सासू
वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा नवरा
आणि
' आमटी फक्कड झालीय गं माझ्या आईची आठवण करून दिलीस' म्हणणारा सासरा
ऑफीसातून परतल्यावर 'बस घटकाभर' म्हणत वाफाळता चहा पाजणारे
आपल्या मुलांचा दंगा खपवून त्यांना सांभाळणारे शेजारी
 
चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी पत्नी
मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे बाबा
आणि सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी
नातवाला फिरवून आणणारे आबा
फेसबुकवर चिडवणारा पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा मेहुणा
इकडे तिकडे पळत हैराण करणार्या नातवाला
गरमागरम वरण भात मायेने भरवणारी आजी
या सगळ्या सुख दुःखात सामील होणारा मित्र 
परिवार किती सुखाचा, आनंदाचा असतो ना 
या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास...!!!

हसत खेळत नाती जोडा नाती जपा....
 
-सोशल मीडिया