रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (11:15 IST)

सर्वेश्वरा, शिवसुंदरा

Sarveshwara
सर्वेश्वरा, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे प्रभुः आमुच्या ने जीवना
 
सुमनात तू गमतारतू
ताऱ्यामध्ये फुलतोस तू 
सध्द्धन जे जगतामध्ये
त्यांच्यामध्ये वसतीस तू
 
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या
श्रमतोस तू शेतामध्ये 
तू  राबसी श्रमिकांसवे 
जे रंजले अन गंजले
पुसतोस  त्यांची आसंवे 
 
स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना
न्यायार्थ जे लढती राणी 
तलवार तू त्यांच्या करी
 
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस तू त्या साधना
 
करुणाकरा, करुणा तुझी
असता महा भय कोठले ? 
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना.
 
कुसुमाग्रज