शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (09:00 IST)

खाण्याच्या वस्तूंवर लाल आणि हिरवे ठिपके चिन्हित का असतात.

आपल्या सर्वाना हे माहित आहे की आजचा तरुण वर्ग पोट भरण्यासाठी पोळी न खाता बाजारात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचे सेवन करतात. बाजारात मिळणाऱ्या त्या पदार्थांवर हे नमूद केलेलं असतं की त्या पदार्थांमध्ये  कोण कोणत्या वस्तूंचा वापर केला आहे.तसेच त्या वस्तूंवर एक विशेष प्रकारचे लाल किंवा हिरवा ठिपका बनलेला असतो.चला तर मग जाणून घेऊ या की खाद्य पदार्थांच्या डब्यावर लाल आणि हिरवा ठिपका का चिन्हित असतो. 
 
वास्तविक खाद्य पदार्थांच्या त्या वस्तूंवर बनलेल्या त्या लाल आणि हिरव्या ठिपक्यांचा अर्थ आहे की ते पदार्थ मांसाहारी आहे की शाकाहारी.जर त्या वस्तूवर लाल ठिपका असेल तर ती वस्तू मांसाहारी आहे,आणि जर ठिपका हिरव्या रंगाचा आहे तर ती वस्तू शाकाहारी आहे.आणि जे खाद्य पदार्थ शाकाहार आणि मांसाहाराच्या मध्ये येणारे असतात जसे की अंडी आणि त्या पासून बनवलेले पदार्थ.तर त्यांच्या वर तांबड्या रंगाचे ठिपके बनलेले असतात. 
या चिन्हाची सुरुवात खाद्य सुरक्षा आणि मानक पॅकेजिंग आणि लेबलिंग रेग्युलेशन 2011 च्या अंतर्गत केली गेली होती.या मानकानुसार जी पाकीट बंद असलेलं खाद्य पदार्थ आहे त्यांच्या वर चिन्ह असणे अनिवार्य आहे. आणि हे देखील सांगितले गेले आहे की लेबलच्या जवळ हे चिन्ह असावे जेणे करून वापरकर्त्याला हे चिन्ह सहज दिसून येतील.आणि वस्तूची माहिती मिळू शकेल.याच कारणास्तव खाद्य पदार्थांवर लाल आणि हिरवे ठिपके चिन्हित असतात.