शुक्रवार, 9 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified रविवार, 30 मे 2021 (18:05 IST)

लाफिंग बुद्धा घरात का ठेवतात जाणून घ्या

आजकाल प्रत्येक दुकानात घरात लाफिंग बुद्धा ठेवले जाते असं का ? लाफिंग बुद्धा म्हणजे काय ? ते ठेवल्याने काय होते जाणून घ्या.
 
आपण ज्यांना लाफिंग बुद्धा म्हणून ओळखतो ते महात्मा बुद्धा चे शिष्य होते.महात्मा बुद्धांचे जपान मध्ये देखील अनेक शिष्य होते.त्यातील होतेई हे त्यांचा आवडीचे शिष्य होते.असं म्हणतात की जेव्हा होतेई यांना पूर्णा ज्ञान मिळाले तेव्हा ते हसत होते.तेव्हा पासून त्यांनी लोकांना हसणे शिकवले.त्यांचे शरीर गोल असून पोट वाढलेले होते.ते लोकांच्या मध्ये असताना आपले पोट दाखवीत लोकांना हसवायचे.आणि वातावरण आनंदी करायचे.त्यांच्या हसणाऱ्या आणि आनंदी स्वभावामुळे लोक त्यांना लाफिंग बुद्धा म्हणायचे.या कारणास्तव चीन आणि जपानचे लोक त्यांना हसणारा बुद्धा म्हणायचे ज्याला इंग्रजीमध्ये लाफिंग बुद्धा म्हणतात. चीन आणि जपान मधील लोक त्यांना देव मानायचे आणि त्यांची मूर्ती घरात ठेवायचे.चीन मध्ये होतेई ला पूतई नावाने ओळखले जाते आणि फॅंगशुईचे देव मानतात. असं म्हणतात की ज्या घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती असते त्या घरात नेहमी सौख,समृद्धी आणि आनंद नांदते.त्या घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.