संबंधित माहिती
- कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा स्टीलची माणुसकी; सोशल मीडियावर होतंय कौतुक
- खग्रास चंद्रग्रहण कसं होतं? ग्रहणांचे किती प्रकार आहेत?
- कोरोना व्हायरस: AC असलेल्या खोलीत किंवा बंद खोलीत राहण्याने कोव्हिडचा धोका वाढतो?
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटे मध्ये मुलांची काळजी अशी घ्या -तज्ञांचा सल्ला
- आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप : कोविड सेंटर त्यांच्याकडून काढून घ्या ! त्या कोवीड सेंटरमध्ये काही ही घडू शकत….
लाजवंतीचे रोपटे हात लावल्यावर कोमजून का जातात -असं का होतं-
आपल्याला आपल्या अवती भवती हिरवेगार झाडे आवडतात,त्या झाडांमध्ये वेग वेगळे गुणधर्म असतात. काही झाडे अशी आहेत जे काटेरी असतात. काही झाडांची पाने टाचण्या प्रमाणे टोकदार असतात. या मध्ये एक रोपटं आहे छुईमुईचे किंवा लाजवंतीचे. याला टच मी नॉट असे ही म्हणतात. जर या झाडाला हात लागला किंवा जोराचे वारे सुटले ,किंवा पाऊस आला तर हे झाड कोमजून जातं.
असं का होत जाणून घेऊ या.
असं म्हणतात की हे झाड खूप लाजाळू आहे. मोठयाने आवाज आल्यावर हे कोमजून जातं. या झाडाचे वनस्पति नाव 'मिमोसा प्यूडिका' आहे. शास्त्रज्ञाच्या मते,वनस्पतीच्या पानांमध्ये अनेक पेशी असतात ज्यामध्ये द्रव भरलेला असतो. पेशींचा हाच द्रव त्याच्या पानांना उभे राहण्यास मदत करतो परंतु या द्रवपदार्थ मध्ये हालचाल झाल्यावर या झाडातील द्रव पदार्थाचे दाब कमी होते. या मुळे याची पाने कोमजतात.
ही वनस्पती प्रामुख्याने भारतातील उष्ण प्रदेशात आढळते. पावसाळ्यात या वनस्पतीत जांभळे,गुलाबी,आणि निळ्या रंगाची फुले येतात. याचा पानात अँटी व्हायरल आणि अँटिफगल गुणधर्म आढळतात.
