गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (21:58 IST)

Shardiya Navratri 2023 : रंगा रंगा च्या साड्या नेसून, का कुठं नवरात्रात भागतं!

Navratri
रंगा रंगा च्या साड्या नेसून, का कुठं नवरात्रात भागतं!
देवीच्या सामर्थ्या ला शरण जा, मगच कुठं शुभ होतं,
एकमेकींना हिनवण्यात च तर सारं आयुष्य ग चाललं,
परपुरुषाशी नातं अनैतिक तूच तर ग जमवलं,
तेंव्हा कुठं गेली स्त्री तुझ्या ग मनातली,
फक्त दाखवायला उपवास करून का तू नवरात्री जागवली?
विचार तूच स्वतः ला, कित्ती कारस्थानं घडविले,
सतत दुसऱ्यास दुखवुन खूप खेळ मांडले,
दाखवते वरवर एक, अन आत वेगळीच असते,
स्वतः च घर सांभाळते, पण दुसऱ्याच्या घरात आग तूच लावते,
मन शुद्ध कर अन कबूल कर सारे अपराध,
आत लपलेल्या राक्षसाचा तूच कर आता वध,
मग कर नवरात्र साजरे, बघ कसं होईल  मंगल मंगल,
 मग बघ कशी ताठ मानेने तुही इथंच जगशील,!!
..अश्विनी थत्ते.