बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जून 2021 (13:32 IST)

आई जिजाऊ होती म्हणून शिवबा घडला

आई जिजाऊ होती म्हणून शिवबा घडला,
बाळकडू पाजले मातेने म्हणून इतिहास घडला,
कणखरपणा होता मातेच्या रक्तात ,
म्हणून उदरी शिकून तुम्ही शिवबा घेतलात,
वरपांगी नसू शकते एवढी जाजवल्यता,
जन्मच घ्यावा लागतो, ती प्रत्यक्षात उतरता,
धन्य ती माऊली जीने सिंहास जन्म दिधला,
होती माय जिजाऊ म्हणून शिवाजी दिसला,
असावी अशीच प्रत्येक माता,स्त्रीत्वास जपाया शिकवावे,
पर स्त्री माते समान, हे पुत्रास समजवावे!
....अश्विनी थत्ते