संबंधित माहिती
- आपल्या पार्टनरमध्ये या 5 गोष्टी असल्यास, लग्नाचा निर्णय चुकीचा असू शकतो
- दिल्ली हिंसाचार: एखाद्याला 'दहशतवादी' ठरवण्याआधी गांभीर्याने विचार करा, दिल्ली हायकोर्टाची सूचना
- चांगली विचारसरणीने वाढतं हृदयाचे आयुष्य
- आता रस्त्यावर थुंकण्यापूर्वी विचार करा
- राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला ठेका दिला नाही : निलेश राणे
पुन्हा वाटते.
पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे
अन् पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे'
हळूच पाहावे पांघरूणातून
ओढूनिया अंगावर माया
निरखावी मग अंधारावर
जरतारी कशिद्याची किमया'
अन तुझिया हृदयाची धडधड
इवल्याश्या गालास कळावी
खोल, संथ श्वासांची चवरी
टाळूवरती सतत ढळावी
आशांच्या नवलाख कळ्यांनी
स्वप्नंवेल तव डवरून जावी
तुझ्याच अंगाचा अवयव मी,
अशीच काही जाणीव व्हावी
हव्याहव्याची हाव निवावी,
सुकेसुके गंगेत नहावे...
- विंदा करंदीकर.
