मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (16:05 IST)

राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला ठेका दिला नाही : निलेश राणे

आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी संभाजी छत्रपतींवर टीका केली आहे. राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिला नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यावर संभाजी छत्रपती काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 
 
खासदार संभाजी छत्रपती यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. ही भेट सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावरून निलेश राणे यांनी ट्विट करून संभाजीराजेंवर टीका केली आहे. संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब व महाविकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं. पण, मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.