शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

पश्चात्ताप

धिक्कारणे स्वतःला पुरेसे वाटत नाही फक्त
करप्ट पश्चात्ताप व्यक्त करून
पुन्हा एका नवीन, सायकीक
गुन्ह्याला मार्ग मोकळा झाला
अशी समजूत करून घेण्याची
निर्लज्ज टेन्डन्सी
हरेक भडक, सावळ्याच
गुन्ह्याच्या तोंडावर
किती फासशील पांढरपेशी पावडर
त्यातील दुष्ट सुरकुत्या डोकावायच्या
थांबतील का बाहेर?
फसफसणारे सवंग, कुजट शब्द
वारांगनेसारखे तोंडाच्या गल्लीवर
बसून खुणवत असतात
तेव्हा त्यांना पिळून एक, एक थेंब
बाहेर काढावा
असा दातओठ खात क्रोधाचा ज्वालामुखी
उसळतो
निष्पन्न काहीच होणार नसेल यातून
तरीही हे अपयशी वंध्यत्व
मी वारंवार झेलीन.....