गुरूवार, 19 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कविता
Written By वेबदुनिया|

मराठी कविता : आगळिक

सौ. माधुरी अशिरगडे

प्रसिद्ध कवयित्रि
WD

खूप वाटायचं तुझी ही
जीवलागण शिळी होऊ नये
कदापि म्हणून...
कारण माझ्या मानसिकतेला
मी चौफेर घायाळ केलं होत
मुझी जवळिक उदरात बाळगताना
माझ्या जीवनप्रेरणा मल
कदापि नकोयत कालबाह्य
व्हायला...
आणि नको व्हायला त्यांन
माझ्याशी वैचारिकदृष्ट्या बदफैल
तुला ही आगळिक वाटतेय.
का माझी?
जो सूर मी आपल्या उभय स्नेहगर्भात लावला त
अनैतिक, बेसूर वाटतोय का तुला ?
तू मला वचन देत आलायस
चेहरयावरील स्मिताच्या सातत्याच
त्या सातत्याचा ओ
आता तुला सावरता
येणार नाही
हा जिव्हाळा आता आक्रसू
चालणार नाह
मी काय करू य
शरीरखुणा उजळविणारया दातृत्वाच
माझी आत्ममग्नता तूच अमर केलीस
आता, आता तर कुठे नवसृजनाचा
जन्मकांड सुरू होतो
आता तुला काढता पा
घेता येणार नाही.