- लाईफस्टाईल
» - मराठी साहित्य
» - मराठी कविता
वाटचाल
डॉ. सौ. उषा गडकरी
रखरखीत उन्हात वाळत घातल्यासारखंआयुष्य खडखडीत कोरडं झालं.दमट, कुबट गंध वरच्यावरच उडून सर्वार्थानं स्वच्छ झालं.प्रखर सूर्याच्या निखार्यागत उन्हानंतावून सुलाखून निघावंतसं सोनाराच्या भट्टीतल्याबावनकशी सोन्यासारखं पिवळधम्म चमकू लागलं.भडकत्या ज्वाळेच्याएकाच रपट्यात सारी जाळी जळमटं जळून खाम व्हावीत्याप्रमाणे सांदी-कोपर्यात लपून बसलेलेराग-विराग, आशा-अभिलाषाएकाच झटक्यात परांगदा झालेसगळी ओझी अशी गळून पडली, एकामागोमागमग मीच माझं बोट धरून हळूवारउगवतीला अभिमुख होऊन चालू लागलेआपोआप.