गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:29 IST)

प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार

साहित्य विश्वातील मानाचा असणारा ‘साहित्य अकादमी’ पुस्स्कार मराठीतील प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांना जाहीर झाला आहे. ‘आलोक’ या कथासंग्रहाला हा पुरस्काराची मिळाला आहे. येत्या 22 फेब्रुवारी 2017 रोजी साहित्य अकादमी पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 1 लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असं ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराचे  स्वरुप आहे. ‘इडा पीडा टळो’ आणि ‘आलोक’ या दोन कथासंग्रहांमुळे संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा लेखकांमध्ये आसाराम लोमटेंचं नाव घेतलं जात.स्तंभलेखक म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख आहे. लेखनातील ग्रामीण बोली, गावाकडच्या माणसांच्या जगण्यातील खाच-खळगे, शेतकऱ्यांची स्थिती, दिनदुबळ्यांची व्यथा आणि त्या व्यथांशी लढणारी माणसं इत्यादी आदीमुळे त्याचे लिखाण मनाला भिडते.