गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By

नामवंत मराठी - हिंदी लेखिका विजया भुसारी यांचे निधन

बृ ह्नमहाराष्ट्रातील ज्येष्ठ ,प्रसिद्ध आणि वयोवृद्ध असून ही अत्यंत कृतिशील लेखिका श्रीमती विजया भुसारी यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.  मृत्युसमयी त्या 83 वर्षाच्या होत्या. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले. एका कृतार्थ जीवनाचा अखेर झाला. 
 
स्वर्गीय विजया भुसारी पूर्वश्रमीच्या विजया पारसनिस होत्या व त्यांनी पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधून बी ए परीक्षा सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण केली होती. त्या इंदुरातील  शासकीय कन्या स्नातकोत्तर हाविद्यालयाच्या मराठी विभागाध्यक्ष पदावरून सेवा निवृत्त झाल्या होत्या. त्यानंतरच त्यांनी मौलिक लेखन आणि अनुवाद करणे सुरु केले होते. गेल्या 15 - 16 वर्षात त्यांची 15 पुस्तकें प्रसिद्ध झाली. त्यांना अनेक सन्मान व प्रतिष्ठित पुरस्कार  लाभले त्यात विशेष उल्लेखनीय व मराठी बांधवांसाठी अभिमानास्पद असा दिल्ली येथील भारतीय अनुवाद परिषदेचा 21000/-रु चा डॉ गार्गी गुप्त द्विवागिश हा  राष्ट्रीयस्तराचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे या अगोदर हा पुरस्कार प्रख्यात लेखक- अनुवाद हरिवंशराय बच्चन आणि लेखिका अमृता प्रीतम यांना मिळाला होता.  
 
काही वर्षापूर्वी माझ्या सूचनेनुसार महाराष्ट्र साहित्य सभेच्या शरदोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांच्या गुणीजन सत्कार करण्यात आला होता. त्यांना दिल्लीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर  त्यांचा मराठी भाषा रक्षण समिति तर्फे विशेष सार्वजनिक सत्कार करण्यात आला होता. माझे व त्यांचे आत्मीय संबंध होते. त्यांची आठवण मला शक्ति देत राहील, श्रीमति भुसारी यांच्या स्मृतींची फुले कधीच सुकणार नाहीत.   
 
या थोर मौन सरस्वती साधिकेस विनम्र श्रद्धांजलि... 
जयदीप कर्णिेक 
संपादक - वेबदुनिया