शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:11 IST)

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने प्रेमानंद गज्वी यांची निवड

९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावं चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
 
यंदाच्या नाट्य संमेलनाचे ठिकाण अजून जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच त्याचादेखील घोषणा केली जाणार आहे. नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.