‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दर एक वर्षाआड देण्यात येणा-या ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी केली आहे. यावर्षी, गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि नुकत्याच झालेल्या कमला मिल दुर्घटनेत अडकलेल्यांना जीवदान देणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे.
येत्या १० मार्चला कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी मविप्रच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. १९९२ पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावणा-या मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. यंदाचे पुरस्काराचे चौदावे वर्ष आहे. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.