शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मार्च 2017 (14:33 IST)

नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांचे निधन

ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे अर्थात विश्वनाथ भालचंद्र देशपांडे  (७८) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.डॉ. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात योगदान देत राहिले. डॉ. देशपांडे यांनी मराठी नाट्यकोश या जवळपास १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन केले. त्यांची जवळपास ५० पेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’ , ‘निळू फुले ‘, ‘|| नाट्यभ्रमणगाथा ||’ , ‘निवडक नाट्यप्रवेश: पौराणिक’ , ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.  उत्कृष्ट संपादनासाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचसोबत त्यांना नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कॉसमॉस पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.