डॉ. आनंद यादव
ग्रामीण साहित्य समृद्ध करणारा लेखक
कसदार ग्रामीण साहित्यासाठी डॉ. आनंद यादव ओळखले जातात. कोल्हापूरजवळ कागल या गावी त्यांचा 30 नोव्हेंबर 1935 ला जन्म झाला. त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागले. त्यांच्या वडिलांचा शिक्षणास विरोध होता. परंतु, काहीही करून शिक्षण घ्यायचेच या ध्यासापोटी त्यांनी प्रसंगी वडिलांचा मार खाऊन शिक्षण घेतले. त्यासाठी प्रसंगी पहाटे लवकर उठून शेतात काम केले. शेतातील काम आटोपल्यावर शाळा व संध्याकाळी परत शेत असे कष्ट केले. हा सारा संघर्ष त्यांनी त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीत मांडला. त्यामुळे उपेक्षित समाजातील मुलांच्या शिक्षणाचे दाहक आणि भेदक वास्तव समोर आले.सहाजिकच या कादंबरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. शिक्षणासाठी संघर्ष कराव्या लागणाऱया यादवांनी नंतरही शिक्षणाची कास सोडली नाही. डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण घेऊन नंतर त्यांनी अध्यापन सुरू केले. आत्मचरित्रात्मकच कादंबरीपुरताच त्यांच्या साहित्याचा आवाका मर्यादीत राहिलेला नाही. त्यानंतरही ग्रामीण पाश्वर्भूमीवर अनेक कादंबऱया लिहिल्या. समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नांगरणी, कांचवेल, गोतावळा ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. आनंद यादव यांची पुस्तके - नांगरणीकाचवेल झाडवाटा मातीखालची मातीखळाळभूमीकन्या नटरंगपाणभवरे गोतावळाझोंबी डवरणी