सोमवार, 4 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (11:16 IST)

पु. ल. देशपांडे यांची माहिती मराठी Pu la Deshpande Information in Marathi

pula deshpande
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल. देशपांडे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक तसेच शिक्षक, अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार, नाटककार, कवी, गायक आणि वक्ते ही होते.
 
पु. ल. देशपांडे जीवन परिचय
पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये ८ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले तसेच त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्‌एल.बी. ची पदवी घेतली आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी केली. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.
 
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली. १९३७ पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले होते.  १९४० च्या दशकात त्यांनी साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. १९४६ साली त्यांचे सुनीताबाईंशी विवाह झाले. १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. 
 
खरं तर आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.ल. यांनी पाठ केलेले पहिले भाषण त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवल्याचे सांगितले जाते. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले. तर ते इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.
 
पुलंना घरात खूप वाचन करायला मिळाले तर रेडिओवरील संगीत ऐकायला देखील मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत अशात ते घरीच बाजाची पेटी शिकले. वडिलांच्या मृत्यूनंतर ते संगीत व अन्य शिकवण्या करू लागले. 
 
१९५५मध्ये पु.ल.देशपांडे आकाशवाणीत नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. नंतर ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले. १९५८ मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९ मध्ये देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. 
 
पु.ल. देशपांडे यांना पुरस्कार आणि सन्मान
साहित्य अकादमी पुरस्कार ("व्यक्ती आणि वल्ली"साठी)- १९६५
पद्मश्री- १९६६
संगीत नाटक अकादमी पुरस्कार- १९६७
संगीत नाटक अकादमी फेलोशीप- १९७९
कालीदास सन्मान- १९८७
पद्मभूषण- १९९०
पुण्यभूषण"- १९९२
महाराष्ट्र भूषण पुरस्कार- १९९६
रवींद्र भारती विद्यापीठ(१९७९), पुणे विद्यापीठ(१९८०) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ(१९९३) कडून मानाची डी. लिट. पदवी
महाराष्ट्र गौरव (बहुरूपी) पुरस्कार
 
पु.ल. देशपांडे यांचे साहित्य
अघळ पघळ (पुस्तक) (१९९८)
अपूर्वाई
असा मी असामी (१९६४)
आपुलकी
उरलं सुरलं (१९९९)
एक शून्य मी
एका कोळीयाने
कान्होजी आंग्रे
काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली)
कोट्याधीश पु.ल. (१९९६)
खिल्ली (१९८२)
खोगीरभरती (१९४९)
गणगोत
गाठोडं
गुण गाईन आवडी
गोळाबेरीज (१९६०)
चार शब्द
जावे त्याच्या देशा
दाद
द्विदल
नस्ती उठाठेव (१९५२)
निवडक पु.ल. भाग १ ते ६
पुरचुंडी (१९९९)
पु लंची भाषणे
पु.लं.चे काही किस्से
पूर्वरंग (१९६३)
बटाट्याची चाळ (१९५८)
भाग्यवान
भावगंध
मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास (१९९४)
मैत्र
वंगचित्रे (१९७४)
व्यक्ती आणि वल्ली (१९६६)
स्वगत (१९९९) (अनुवादित)
हसवणूक (१९६८)
 
अनुवादित कादंबऱ्या
काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली)
एका कोळीयाने (१९६५) (मूळ कथा: The Old Man and the Sea लेखक : अर्नेस्ट हेमिंग्वे)
कान्होजी आंग्रे
 
प्रवासवर्णने
अपूर्वाई (१९६०)
पूर्वरंग (१९६३)
जावे त्यांच्या देशा (१९७४)
वंगचित्रे (१९७४)
 
व्यक्तिचित्रे
आपुलकी (१९९९)
गणगोत (१९६६)
गुण गाईन आवडी (१९७५)
चित्रमय स्वगत - आत्मकथन
मैत्र (१९९९)
व्यक्ती आणि वल्ली (काल्पनिक) (१९६६)
स्वगत (१९९९) (अनुवादित, मूळ लेखक - जयप्रकाश नारायण)
 
चरित्रे
गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)
 
एकपात्री प्रयोग
बटाट्याची चाळ (१९६१ )
वाऱ्यावरची वरात (काही प्रसंग) (१९६२)
 
एकांकिका-संग्रह
आम्ही लटिकेना बोलू (१९७५)
मोठे मासे आणि छोटे मासे (१९५७)
विठ्ठल तो आला आला (१९६१)
 
पु.लं. देशपांडे यांची नाटके
अंमलदार (नाटक) (१९५२) (मूळ लेखक - निकोलाय गोगोल)
एक झुंज वाऱ्याशी (१९९४)
तीन पैशाचा तमाशा (१९७८) (मूळ लेखक - बेर्टोल्ट ब्रेख्त)
ती फुलराणी (१९७४) (मूळ लेखक - जॉर्ज बर्नार्ड शॉ) (मूळ नाटक - पिग्मॅलियन)
तुका म्हणे आता (१९४८)
तुझे आहे तुजपाशी (१९५७)
नवे गोकुळ
पहिला राजा/आधे अधुरे (१९७६) (मूळ लेखक: जगदीशचंद्र माथुर)
पुढारी पाहिजे (एकांकिका)
भाग्यवान (१९५३)
राजा ईडिपस (राजा ओयादिपौस) (१९७९) (मूळ लेखक - सोफोक्लीझ)
वटवट वटवट (१९९९)
सुंदर मी होणार (१९५८)
लोकनाट्ये
पुढारी पाहिजे (१९५१)
वाऱ्यावरची वरात
 
पु.ल. देशपांडी यांची काही विनोदी कथा
एका रविवारची कहाणी
बिगरी ते मॅट्रिक
मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?
म्हैस
मी आणि माझा शत्रुपक्ष
पाळीव प्राणी
काही नवे ग्रहयोग
माझे पौष्टिक जीवन
उरलासुरला
 
व्यक्तिचित्रे
अण्णा वडगावकर
गजा खोत
ते चौकोनी कुटंब
तो
दोन वस्ताद
नामू परीट
परोपकारी गंपू
बबडू
बापू काणे
बोलट
भय्या नागपूरकर
लखू रिसबूड
हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका
हरितात्या
 
संकीर्ण
चार शब्द
दाद
पुरुषराज अळूरपांडे (सहलेखक म.वि. राजाध्यक्ष, रा.वा. अलूरकर)
मित्रहो!
रवींद्रनाथ : तीन व्याख्याने
रसिकहो!
रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १
रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २
श्रोतेहो!
सृजनहो!
 
पु.ल. देशपांडे यांच्या चित्रपटांची यादी
१९४७ - कुबेर
१९४८ - भाग्यरेषा
१९४८ - वंदे मातरम्
१९४९ -जागा भाड्याने देणे आहे
१९४९ - मानाचे पान
१९४९ -मोठी माणसे
१९५० -गोकुळचा राजा
१९५० - जरा जपून
१९५० - जोहार मायबाप
१९५० - नवरा बायको
१९५० - पुढचं पाऊल
१९५० - वर पाहिजे
१९५० - देव पावला
१९५२ - दूधभात
१९५२ - घरधनी
१९५२ - संदेश
१९५३ - देवबाप्पा
१९५३ - नवे बिऱ्हाड
१९५३ - गुळाचा गणपती
१९५३ - महात्मा
१९५३ - अंमलदार
१९५३ - माईसाहेब
१९६० - फूल और कलियॉं
१९६३ - आज और कल