शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (08:38 IST)

Weather Update पुढील तीन दिवस वादळी पाऊसााचा इशारा

कोल्हापूर, सांगली,साताऱ्यासह सोलापुरात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. 15 ते17 मार्च या कालावधीत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, नागरिकांनी सतर्क रहावे असा सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
 
मागच्या आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भात हाता-तोंडाला आलेले पिक पावसाने संपुष्ठात आले आहे. दरम्यान आता कोल्हापूरसह सांगली,सातारा आणि सोलापुरात वादळी पावसाच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
 
हवामान विभागाचे परीपत्रक
तसेच मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला असून यात धुळे, जळगाव आणि नाशकात काही ठिकाणी 15 मार्च रोजी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात 16 आणि 17 मार्च रोजी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor