1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 मार्च 2023 (15:39 IST)

पुढील 3 दिवस महत्वाचे ,राज्यात उष्णतेची भीषण लाट

महाराष्ट्रातील मुंबई, कोंकण, गोवामध्ये सर्वात तापमानमध्ये वाढ होईल. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. 
 
उष्मघातापासून वाचण्यासाठी काय करावं? 
वाढत्या तापमानाविषयी सतर्क करण्यासोबतच आयएमडीनं गोव्यातील नागरिकांना शरीरातील पाण्याची पातळी संतुलिक ठेवण्याचंही आवाहन केलं आहे. यासाठी पुरेसं पाणी पिणं, लिंबू सरबत किंवा तत्सम पाण्याचा अधिक अंश असणाऱ्या पदार्थांचं सेवन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 
लहान मुलं आणि घरातील वृद्धांची यावेळी विशेष काळजी घ्या असं सांगत पुरेसा आहार करण्याचा सल्लाही सध्या देण्यात आला आहे.
 
गरज नसल्यास घराबाहेर पडू नका 
गोव्यात तापमानाचा उच्चांक पाहता दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे. शिवाय या काळात वणवा पेटू शकतो, त्या दृष्टीनंही राज्य शासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता गोवा शासनानं 9 तारखेपासून 10 मार्चपर्यंत दुपारी 12 ते 4 या कालावधीत शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
आयएमडीच्या निरीक्षणानुसार मुंबईत पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि उर्वरित कोकण पट्ट्यातही तापमानाचा आकडा वाढलेला असेल त्यामुळं नागिरकांनीही काळजी घेणं अपेक्षित आहे. सध्याचा काळ सुट्ट्यांचा असल्यामुळं या भागांमध्ये जाऊ पाहणाऱ्यांनीही हवमानाचा अंदाज गांभीर्यानं घ्यावा हे महत्त्वाचं.
 
 
Edited By - Priya Dixit