शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2023 (21:51 IST)

चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडून रिक्षाने प्रवास करणाऱ्या माय-लेकीचा मृत्यू

death
मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये  इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड खाली पडून रस्त्यावरून रिक्षाने प्रवास करणाऱ्या माय-लेकीचा गंभीर अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात दोघींचाही मृत्यू झाला आहे. अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिच्या मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  
 
जोगेश्वरी पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग लगत असलेल्या सोनार चाळ परिसरात मलकानी डेव्हलपर्सच्या बांधकाम साईटवर घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास शमाबानो शेख (२७) या त्यांची मुलगी आयात (९) ला घेऊन स्टेशन रोडवरून मेघवाडीच्या दिशेने रिक्षाने प्रवास करत होते.तपश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्याच्या चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड अचानक खाली पडला जो थेट मायलेकी प्रवास करत असलेल्या रिक्षावर जाऊन आदळला.
 
 दरम्यान या संबंधित विकासावर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor