गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 11 मार्च 2023 (17:55 IST)

सांगली :पाण्यावरून वाद काका-पुतण्याच्या निर्घृण खून

murder
सांगलीमध्ये विहिरीच्या पाण्याच्या वादावरून काका-पुतण्याची हत्या करण्यात आली या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदर घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातच्या कोसारी या ठिकाणी घडली आहे. विहिरीच्या पाण्याच्या वादावरून झालेल्या हाणामारीतून घटना घडली असून विलास नामदेव यमगर (45)आणि प्रशांत दादासो यमगर(23) असे या मयत काका पुतण्याची नावे आहेत. जत तालुक्यात कोसारी येथे यमगरला भावबंधकी मध्ये शेतात एकच विहीर असल्यामुळे पाण्यावरून वाद झाला. नंतर हा वाद टोकेला पोहोचला आणि विलास आणि प्रशांत यमगर कुटुंबियांवर इतर चुलत्यांनी पंधरा जणांसह हल्ला केला. त्यात विलास यमगर, प्रशांत यमगर यांच्या निर्घृण खून करण्यात आला तर दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके, आणि विजय विलास यमगर हे गंभीर जखमी  झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय  रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाचा तपास सुरु आहे.   
 
  Edited By - Priya Dixit