1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक

शेवाळकरांचे साहित्य जगतातील योगदान

मराठी संत साहित्यातील महामेरू म्हणून ओळख मिळविलेल्‍या आणि केवळ मराठी रसिकांसाठीच नव्‍हे तर अमेरिकेतील मराठी जनांसाठीही आधारवड ठरलेले प्रा.राम शेवाळकर यांच्‍या अकाली जाण्‍याने साहित्‍य जगताची मोठी हानी झाली आहे. शेवाळकरांनी आपल्‍या साहित्यिक कारकीर्दीत विपूल लेखन केले. त्‍यांच्‍या साहित्यिक योगदानाची ही झलक...

चरित्र ग्रंथः महर्षी विनोबा, साम्ययोगी विनोबा

कवितासंग्रहः असोशी, रेघा, अंगारा

आत्मकथनः माहेरचे दिवस, रांगोळी, ध्यासशिखरे, माझी दृष्टी-माझी सृष्टी, स्नेहगोत्री, पाणियावरी मकरी.

व्यक्तीवेधः उजेडाची झाडे, देवाचे दिवे, प्रवास आणि सहवास, प्रसन्नतेचा मूक कटाक्ष, दर्शन विनोबांचे, मोरपीस, वर्तुळ आणि क्षितीज, भावबंध

ललितः अमृतझरी, पूर्वेची प्रभा, तारकांचे गाणे, रामसेतू, माणिकाच्या वाती, आकार आणि सुवास, संवादाचा सुवावू,

लेखसंग्रहः भावबंध, सारस्वताचे झाड, रुचिभेद, आकाशाचा कोंब, त्रिदल, द्वादशी, प्रतिध्वनीचे मानस, कीर्तन-संकीर्तन, प्रतितीधर्म, वाळ्याचा मळा, विमर्ष, पांढ-यावरती काळं, ज्ञानपुनव, उजळावया वाटा, उजेडाची पालवी. सोयरे, उजळावया वाटा (प्रस्तावना संग्रह)

संपादित ग्रंथः अक्षरमाधव, शिक्षणविचार, निरुपणचंद्रिका, विनोबासारस्वत, यशोधन, निवडक मराठी आत्मकथा, विचारशासन, विनोबांचे धर्मकीर्तन, संक्रांती, आमचे विनोबा, रूपे तीर्थरूपांची, लोकमान्य टिकळांचे निबंध, तूलाधर, चित्रगुत्त, त्रिविक्रम आणि संचित, विचक्षणा

अनुवादीत ग्रंथः अग्निमित्र (महाकवी भास यांच्या नाट्यावर आधारित), अभिज्ञान शाकुंतल, भारतनाट्य, प्रतिज्ञायौगंढरायन, स्वप्नवासवदत्ता, मालविकाग्नित्र, विक्रमोर्वशीय, कालिदासाची यक्षसृष्टी, चारुदत्त आणि क्षुद्रककृत्य मृच्छकटिक, त्रिवेणी आदींचे मराठी आणि संस्‍कृतमध्‍ये भाषांतर.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा