गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By

इंदूरची बिजासन देवी

या देवी सर्वभूतेषु माँ शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तयै नमस्तयै नमस्तयै नमो नम:।

संपूर्ण देशात सध्या चैत्र नवरात्र साजरे केले जात आहे. देवीच्या मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा आहेत. धर्मयात्रेत या वेळी आम्ही आपल्याला इंदूरच्या बिजासन देवीचे दर्शन घडवित आहोत. मंदिरात चैत्र नवरात्रातील 9 दिवस रोज शतचंडी महायज्ञ होत आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी होत आहे.

मंदिरात देवीच्या पाषाण मूर्ती आहेत. वैष्णोदेवीप्रमाणे येथेही देवी पाषाणातील पिंडरूपात आहे. मंदिराच्या पुजार्‍यांच्या मते, या पिंडी स्वयंभू आहेत. त्या येथे कधीपासून आहेत, याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही. आम्हीच अनेक वर्षांपासून त्यांची पूजा करत आहोत, असे पूजारी सांगतात.

  WD
आधी ही टेकडी होळकरांच्या राज्यात होती. एकदा शिकारीसाठी आलेले असताना राजघराण्यातील लोकांची दृष्टी ह्या मंदिरावर पडली. त्यानंतर मग सन 1920 मध्ये येथे पक्के मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत येथे भाविकांची अपार गर्दी असते. येथे केलेले नवस पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या प्रांगणात एक तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत. या माशांना अन्न घातले तर पुण्य प्राप्त होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतात, असे भाविक मानतात.

मंदिरात प्रत्येक नवरात्रीला यात्रा भरते. टेकडीवरून बघितल्यावर इंदूर शहराचे नयनरम्य दृश्य दिसते. मंदिरच्या जवळच गोम्मटगिरी आणि हिंकारगिरी नावाचे जैनांचे पवित्र स्थळ आहे. येथे दरवर्षी चातुर्मासात जैन मुनी येतात.

कसे पोहचाल ?
इंदूर मध्यप्रदेशची औद्योगिक राजधानी आहे. मुंबई-आग्रा महामार्ग इंदूरमधूनच जातो. देशाच्या कुठल्याही भागातून येथे रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गे पोहचता येते. हे मंदिर इंदूर विमानतळापासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे.