शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप
'
वाराणसीतु भुवनत्रया सारभूत रम्या नृनाम सुगतिदाखिल सेव्यामना अत्रगाता विविधा दुष्कृतकारिणोपिपापाक्ष्ये वृजासहा सुमनाप्रकाशशः' नारद पुराण गंगा नदीच्या पश्चिम किनार्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात, असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी ती इथेच असे त्यांना वाटते. परदेशातूनही लोक येथे येतात आणि गंगेच्या घाटाच्या सानिध्यात वसलेल्या मठ-मंदिरात जाऊन मनाला शांती देऊ शकणार्या साधूंच्या चरणी नतमस्तक होतात. धार्मिक महत्त्व