जैन क्षमावाणी पर्व
| |
तसे पाहिले तर पर्युषण पर्व दीपावली, ईद अथवा ख्रिसमस या सणांप्रमाणे उत्साह व आनंदाने साजरा केला जाणारा सण नाही. तरी देखील त्याचा प्रभाव संपूर्ण जैन समाजावर दिसून येतो. मध्य प्रदेशातील इंदूर येथील दिगम्बर जैन मंदिरात यंदा मोठ्या भक्तीभावनेने पर्युषण पर्व साजरे झाले. हजारोंच्या संख्येने जैन समाजबांधवांनी भगवान महावीर यांचे दर्शन घेतले.
|
पर्युषण पर्व समारोपावेळी 'क्षमावाणी पर्व' साजरे केले जाते. या दिवशी जैन समाजबांधव गत वर्षात त्यांच्याकडून कुणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष दुखावले गेल्यास भगवान महावीरांना शरण जाऊन क्षमा मागतात. जैन धर्मात असे म्हटले जाते की, क्षमा मागणार्या पेक्षा क्षमा करणारा श्रेष्ठ असतो.
