१९४० च्या दशकात खादी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. त्यावेळी भारताने स्वदेशीचा नारा देऊन विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून खादी अस्मितेचा विषय मानला होता. आता इतक्या वर्षानंतरही खादीची लोकप्रियता कमी झाली नाही. भारतातच नाही तर विदेशातही खादीची लोकप्रियता वाढली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणार्या खादीला आता फॅशन डिझायनरनेही पहिली पसंती दिली आहे. पहिल्यांदा खादी केवळ कवी, लेखक आणि पत्रकार लोकांपुरतीच मर्यादीत होती. आता तसे राहीले नाही. आता रॅंपवर चालणारा उत्कृष्ट मॉडेलदेखील खादी पसंत करतो. उन्हाळ्यात खादीचा वापर केला नाही तर तिच्याबरोबर अन्याय केला जाईल असे म्हणायला हरकत नाही. खादीपासून तयार केलेले कपडे आकर्षक असतात आणि व्यक्तीमत्त्व त्यात उठून दिसते. आपण कोणत्याही वयात खादी स्टाइलशीर वापरू शकतात. ती प्रत्येक रूपात आपल्याला शोभून दिसेल.प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ......