प्रिय भारतवासीयांनो, NDND मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला...