गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

आता प्रकाशकांचीही ठिणगी

किरण जोशी

साहित्य संमेलनाचा एक वाद संपुष्टात येत नाही तोच नवीन वाद जन्माला येत आहे. साहित्य महामंडळाच्या कामकाजाला कंटाळून आणि प्रकाशक मेहता यांच्यासह पत्रकारांना धक्काबुक्की झाल्यानंतर प्रकाशन महामंडळाने या प्रकरणी साहित्य महामंडळाला नोटीस धाडण्याचा निर्णय घेतला आहे.

मेहता यांना शनिवारी धक्काबुक्की करण्यात आल्यानंतर संमेलनासाठी उपस्थित प्रकाशकांनी महामंडळाविरोधात बिगुल वाजवण्याचे निश्चित केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून संमेलन भरवले जात असताना नेहमीच प्रकाशक आणि संमेलनस्थळी स्टॉल लावणाऱ्या वितरकांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप प्रकाशन महामंडळाचा आहे.