गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|
Last Modified: तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी, महाबळेश्वर , शुक्रवार, 20 मार्च 2009 (21:31 IST)

आनंद यादवच अध्यक्ष

साहित्य संमेलानाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवण्यात आला असून अध्यक्षविनाच साहित्य संमेलनाची सुरवात झाली. परंतु संमेलनाचे अध्यक्ष डॉ.यादवच असून वारकर्‍यांच्या समाधानासाठी राजीनामा स्थगित ठेवल्याची चर्चा संमेलनात होती.

डॉ.यादव यांच्या राजीनाम्यानंतर शंकर सारडा यांनी अध्यक्ष होण्याची इच्छा जाहीररित्या व्यक्त केली होती. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत नवीन अध्यक्षांबाबत कोणताही निर्णय न घेता डॉ.यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संमेलनात साहित्यकांनी केलेल्या मागणीनुसार अध्यक्षांचे भाषणही दिले जाणार आहे. यामुळे डॉ.यादव व्यासपीठावर नसले तरी अध्यक्ष तेच राहतील, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. त्यानंतर महामंडळाची बैठक घेवून डॉ.यादवच अध्यक्ष असल्याचे जाहीर केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे.