Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यात गुलाबाच्या रोपांना काळ्या ठिपक्यांच्या बुरशीपासून वाचवण्याचे प्रभावी उपाय

Updated: मंगळवार, 21 जुलै 2026 (15:22 IST)
 
२. झाडाची छाटणी करा 
झाडाच्या मध्यभागी खूप गर्दी झाली असेल, तर आतल्या बाजूच्या लहान-सहान फांद्या छाटून टाका.
 
रोपाच्या सर्व भागांना पुरेशी हवा आणि सूर्यप्रकाश मिळाला, तर पानांवरील पाणी पटकन वाळते आणि बुरशीची वाढ रोखली जाते.
 
३. सेंद्रिय आणि घरगुती उपाय
बेकिंग सोडा स्प्रे:
साहित्य: १ लिटर पाणी + १ लहान चमचा बेकिंग सोडा + ४-५ थेंब डिश वॉश लिक्विड (किंवा शाम्पू).
वापर: हे मिश्रण एकत्र करून आठवड्यातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी झाडावर सर्व बाजूने (विशेषतः पानांच्या खालच्या बाजूला) फवारा.
 
दूध आणि पाण्याचा स्प्रे :
साहित्य: १ भाग दूध (कच्चे किंवा उकळलेले) + २ भाग पाणी.
 
वापर: दुधामध्ये नैसर्गिक बुरशीनाशक गुणधर्म असतात. हा स्प्रे उन्हात/सकाळी फवारल्यास बुरशीवर खूप चांगला परिणाम होतो.
 
हळद आणि लाकडाची राख:
कुंडीतील मातीची वरची पातळी हलकी उकरून त्यात १ चमचा हळद आणि लाकडाची राख मिसळा. यामुळे मुळांजवळ होणारा बुरशीचा संसर्ग थांबतो.
 
४. रासायनिक बुरशीनाशकाचा वापर 
संसर्ग जास्त वाढला असल्यास घरगुती उपायांऐवजी बाजारात मिळणाऱ्या Fungicide चा वापर करा:
साफ  किंवा बाव्हिस्टिन किंवा एम-४५ (M-45) हे बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दर १० ते १२ दिवसांनी रोपावर फवारा.
 
पावसाळ्यातील ५ अति-महत्त्वाच्या टिप्स:
झाडाला वरून पाणी देऊ नका: पावसाळ्यात झाडाला पाणी देताना फक्त मातीत द्या. पानांवर पाणी शिंपडणे पूर्णपणे टाळा.
 
कुंडीतील पाण्याचा निचरा: कुंडीच्या तळाशी असणारे पाण्याचा निचरा होणारे छिद्र मोकळे आहे की नाही ते तपासा. साचलेले पाणी बुरशीला आमंत्रण देते.
 
रोपाची जागा बदला: शक्य असल्यास कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे कमीत कमी २-३ तास तरी थेट सूर्यप्रकाश मिळेल आणि पावसाचे थेट अति-मुसळधार पाणी रोपावर पडणार नाही.
 
कात्री निर्जंतुक करा: फांद्या किंवा पाने कापण्यासाठी वापरणारी कात्री किंवा कटर लॉकडाऊन/सॅनिटायझरने साफ करूनच वापरा, अन्यथा एका रोगाचा संसर्ग दुसऱ्या झाडाला होईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? घरातून कायमचे दूर ठेवतील 'हे' 7 सोपे उपाय

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

डीजेच्या मोठ्या आवाजाचा आरोग्यावर गंभीर परिणाम! या ५ समस्या होऊ शकतात, वेळीच घ्या काळजी

HRM मध्ये Executive MBA करून बनवा दमदार करिअर! पात्रता, अभ्यासक्रम, टॉप कॉलेजेस आणि पगाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

रुक्ष केसांना द्या रेशमी आणि मुलायम स्पर्श! फक्त या सोप्या टिप्स करा फॉलो

तुम्हीही बटाटे चुकीच्या पद्धतीने उकळताय? 'या' ३ ट्रिक्स वापरून सेकंदात साल काढा

चायनीज ट्विस्ट, मसालेदार आणि चटपटीत शेजवान पोहा एकदा नक्की चाखून बघा

पुढील लेख