शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

24 तास ब्रा घालता? जाणून घ्या हे 6 नुकसान

स्तनाच्या आरोग्य आणि योग्य शेपसाठी ब्रा घालणे आवश्यक आहे. याने फिगर सुंदर आणि शेपमध्ये दिसतं. पण यासाठी आपण टाइट ब्रा घालता का? किंवा पूर्ण 24 तास ब्रा घालून ठेवता? जर असे असेल तर याचे गंभीर परिणाम जाणून घेणं आवश्यक आहे-

1. वेदना- सतत ब्रा घातल्याने वेदना होणं साहजिक आहे. जसे खूप तास टाइट कपडे घातल्यावर शरीराला अस्वस्थता वाटते तसेच स्तनांनापण वाटते. यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ पात नाही आणि त्वचेचे रोग होण्याची शक्यता वाढते.
2. रक्त प्रवाह- हे आपल्या रक्त प्रवाहाला प्रभावित करतं आणि रक्त पूर्णपणे स्तनांपर्यंत पोहचत नाही ज्याने आंतरिक समस्या वाढतात. तसेच वायर मटेरियल किंवा टाइट स्पोर्ट्स ब्रा घातल्याने आपल्या स्तनाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकते.
 
3. रेशेस- नाजुक त्वचेवर लाल डाग येणे किंवा त्या भागात खाज येणे, जळजळ होणे, हे सर्व 24 तास ब्रा घालण्याचे परिणाम असू शकतात. मुख्यतः: रात्री ब्रा घालून झोपणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.

4. शेप- ब्रामुळे स्तनांना शेप येत असला तरी सतत ब्रा घातल्यामुळे शेप बिघडूपण शकतो. आपल्या ब्राचा साइज योग्य असला पाहिजे.
 
5. खांदेदुखी- सतत ब्रा घातल्याने खांदेदुखीला सामोरा जावं लागतं. याव्यतिरिक्त त्वचेवर डाग येणे किंवा जखम होण्यासारख्या समस्याही होऊ शकतात.
 
6. बॅक्टेरिया- 24 तास ब्रा घातल्याने त्वचा स्वच्छ राहत नाही. त्या भागात घाम किंवा नमी येतं ज्यामुळे फंगस किंवा बॅक्टेरिया सारख्या स्थितीला समोरा जावं लागतं. ही स्थिती फार हानिकारक आहे.