पाळी टाळण्याचे सोपे उपाय
मासिक पाळी एक नैसर्गिक प्रक्रिया असून 28 ते 32 दिवसांदरम्यान महिलांना या चक्रातून जावं लागतं. अनेकदा या दरम्यानच काही महत्त्वाचे काम पडतात किंवा घरात लग्न कार्य असल्यास त्यात पाळी आल्यामुळे मूड विस्कटतं. अनेकदा महिला मेडिसिन घेऊन पाळी पुढे ढकलतात परंतू त्याचे साईट इफेक्ट्स असतात. परंतू देशी घरगुती उपाय अमलात आणून पाळी टाळली जाऊ शकते आणि त्याचे साईट इफेक्ट्सही होत नाही. तर बघू असे सोपे उपाय:
ओव्याची पाने
ओव्याची पाने उकळून त्यात मध मिसळावे. हे पाणी पिण्याने पाळी टळते. हा उपाय संभावित तारखेच्या सात दिवसाआधीपासून सुरू करावा.
पुदीना
काकडीच्या रसात पुदीनाच्या पानांचा रस मिसळून प्यावा.
व्हिनेगर
दिवसातून तीन ते चार वेळा एक ग्लास पाण्यात व्हिनेगर मिसळून प्यावे. याने पाळी टळेल.
मसालेदार आहार टाळा
मसालेदार आहाराने शरीरात रक्त प्रवाह वाढतं ज्यामुळे पाळी लवकर येण्याची शक्यता वाढते. पाळीची तारीख टाळायची असल्यास एक आठवड्यापूर्वीपासून मसालेदार आहाराला नकार द्यावा. पाळी पुढे वाढवण्यासाठी हा उपाय सर्वात योग्य ठरेल.
लिंबू
पाण्यात लिंबू पिळून पिण्याने काही वेळासाठी पाळी पुढे ढकलता येते. लिंबू पाणी डिस्चार्ज कमी करण्यातही मदत करतं. किंवा इतर साइट्रिक फळं शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करत असून पाळी टाळण्यातही मदत करतात. पाळी ढकलायची असल्यास त्या दरम्यान अधिक प्रमाणात लिंबू पाणी प्यावे.
जिलेटिन
पाळी टाळण्यासाठी जिलेटिन प्रभावी मानले गेले आहे परंतू हे केवळ इमरजेंसी असल्यास घ्यावे. तसेच जिलेटिनमुळे केवळ काही तासांसाठी पाळी ढकलता येते. गरम पाण्यात 2 मोठे चमचे जिलेटिन घोळून प्यावे. याने पाळी काही तासांसाठी टळते.