बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये?

लिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. लिंबाचा प्रयोग वाईट नजराशी संबंधित प्रकरणांमध्ये केला जातो. याचे सर्वात महत्त्वपूर्ण कारण याची चव आहे. लिंबू आंबट आणि मिरची तिखट असते, दोघांचे हे गुण व्यक्तीची एकाग्रता आणि ध्यान भंग करण्यास सहायक सिद्ध होते.  
 
नेहमी लोक आपले घर, ऑफिस किंवा दुकानात वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबू -मिरची बांधतात. जेव्हा हे खराब होते तेव्हा रस्त्यावर फेकून देतात.  
 
तुम्ही अधिकतर मोठ्या लोकांना असे म्हणताना ऐकले असतील की रस्त्यावर जर लिंबू मिरची पडली असेल तर त्यावर पाय ठेवू नये. यामागे कुठलेही अंधविश्वास नाही आहे. याचे एक फार मोठे कारण आहे.  
 
जेव्हा कोणीपण वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबू मिरची बांधतो तर त्या घरावर किंवा व्यापार स्थळावर जो कोणी    नकारात्मक विचाराने त्याकडे बघतात तर ती नकारात्मक ऊर्जा त्या लिंबू द्वारे ग्रहण करण्यात येते.  
 
लिंबू मिरचीला त्या जागेवरून हटवून रस्त्यावर म्हणून फेकण्यात येते की लोकांचे पाय त्यावर पडेल.  
 
यामुळे त्या व्यक्तीचा तर फायदाच होतो कारण जेवढे जास्त पाय त्या लिंबू मिरचीवर पडतात तेवढेच नकारात्मक विचार आणि वाईट नजरेचे प्रभाव कमी होतात, आणि त्याचे दुकान किंवा व्यापारिक स्थळावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो.  
 
पण जे लोक त्यावर पाय ठेवतात तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजरेचा प्रभाव त्याच्या जीवनावर पडू लागतो आणि त्याच्या प्रगतीत व चांगल्या कामांमध्ये अडचणी येऊ लागतात, कारण नकारात्मक ऊर्जा जीवनाला प्रभावित करते. म्हणून रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय ठेवण्यापासून स्वत:चा बचाव करायला पाहिजे.