सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का मारतात दंडा, जाणून घ्या!

हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला हिंदू धर्मात अंतिम संस्कार मानले जाते. अंतिम संस्कार दरम्यान एका मृत शरीराला जाळून या जगातून निरोप देण्यात येते. अंतिम संस्कारादरम्यान बर्‍याच प्रकारच्या विधी केल्या जातात जसे डेक्यावरचे केस काढणे, मृत शरीराच्या चारीबाजूने चक्कर लावणे आणि जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर दंडा मारणे.  
 
कदाचित आमच्यातून बर्‍याच लोकांना या विधीबद्दल माहीत नसेल. हिंदू धर्मात जळत असलेल्या चितेत खोपडी किंवा डोक्यावर दंडा का मारला जातो.  
 
कपाला मोक्षम विधी   
शास्त्रानुसार एका मनुष्याच्या शरीरात 11 द्वार असतात. असे मानले जाते की आत्मा किंवा जीव बह्मरंध्र (मस्तिष्काचा द्वार )मधून शरीरात प्रवेश करते. जिवा किंवा आत्मा तुमच्या कर्मांच्या आधारे या दाराच्या माध्यमाने शरीरातून निघते. ब्रह्म रंध्राला शरीरात उपस्थित 11 द्वारातून उच्च मानले गेले आहे. असे मानले जाते की जो जीव किंवा आत्मा डोक्यातून निघते ती मोक्ष प्राप्त करून जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होते. या विधीला 'कपाला मोक्षम' देखील म्हटले जाते. पण ही विधी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय प्राप्त करणे फारच अवघड काम असत. म्हणून मृतकाचे नातेवाईक मृत शरीराच्या डोक्यावर किंवा कपाळावर दांड्याने मारतात. 
 
दांड्याने तीनवेळा मारण्याचे काय कारण 
ही एक प्रकारची प्रथा आहे, जेव्हा एक वेळेस मृतदेह जळू लागते तेव्हा कर्ता ( मुखाग्नि देणारा ) बांबूच्या दांड्याने मृत व्यक्तीच्या खोपडीवर 3 वेळा मारतो. कारण एका वेळेस ती तुटत नाही म्हणून 3 वेळा मारण्यात येते.  
 
आत्मेच दुरपयोग होण्यापासून बचाव करण्यासाठी  
असा तर्क देखील देण्यात येतो की जेव्हा कोणी मरण पावत तेव्हा त्याच्या डोक्याला दांड्याने मारून या साठी फोडण्यात येते कारण तंत्र विद्या करणारे जे लोक असतात ते व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या डोक्याच्या फिरकीत असतात आणि त्याच्या दुरुपयोग करू शकतात व असे देखील म्हटले जाते की या डोक्याद्वारे तांत्रिक त्या व्यक्तीला आपल्या कब्ज्यात करून घेतात आणि आत्मेकडून चुकीचे काम करवू शकतात.  
 
आत्मेचे काय होते ?
शास्‍त्रात लिहिले आहे की शरीर मरत पण आत्मा कधीही मरत नाही. एखाद्या व्यक्तीच्या मेल्यानंतर आत्मा लगेचच दुसर्‍याच्या गर्भात प्रवेश करते. असे म्हणतात की जेव्हा आत्मा शरीर सोडते तेव्हा ती पूर्णपणे धरती सोडू शकत नाही. काही दिवस ती आपल्या प्रियजनांजवळ राहते जेव्हापर्यंत ती स्वर्गांत पूर्णपणे वसत नाही.