Daily Horoscope
✕

Irregular Periods मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर ही कारणे असू शकतात, घरगुती उपाय जाणून घ्या

Updated: शनिवार, 4 मार्च 2023 (12:42 IST)
 
आजार
कोणत्याही प्रदीर्घ आजारामुळे किंवा अचानक सर्दी, खोकला किंवा ताप आल्याने मासिक पाळीला उशीर होऊ शकतो. तथापि, हे काही काळासाठीच घडते. ही समस्या दूर होताच मासिक पाळी पुन्हा नियमित होते.
 
बर्थ कंट्रोल पिल्स
बर्थ कंट्रोल पिल्सचे सेवन केल्याने देखील पीरियड सायकलमध्ये बदल येऊ शकतो.

या सर्वांव्यतिरिक्त, उशीरा मासिक पाळीची इतर कारणे असू शकतात जसे की-
पीसीओएस
अधिक व्यायाम
हार्मोनमध्ये असंतुलन
प्रोलॅक्टिनची पातळी वाढलेली
मधुमेह किंवा थायरॉईड
 
मासिक पाळी न येण्याचे नुकसान -
मासिक पाळी न येण्याचे अनेक तोटे असू शकतात. तथापि उपचारांच्या मदतीने हे टाळले जाऊ शकते.
 
प्रजनन क्षमता कमी होणे
हाडे कमकुवत होणे
लठ्ठ लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो
महिला खेळाडूंना वयानुसार ऑस्टियोआर्थरायटिसचा धोका वाढतो
काही प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो
 
जर तुमची मासिक पाळी उशीरा येत असेल तर तुम्ही ताबडतोब अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्यावा.
 
अनियमित मासिक पाळी सामान्य करण्यासाठी घरगुती उपाय
एक ग्लास दुधात एक चमचा हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करावे.
एक कप पाण्यात आल्याचा लहानसा तुकडा घालून उकळून घ्यावे नंतर त्या पाण्यात आवडीप्रमाणे मध, मीठ किंवा काळीमिरीपूड घालून दिवसातून तीन वेळा महिनाभर सेवन करावे.
एक ग्लास दुधात अर्धा चमचा दालचीनी मिसळून सेवन करावे.
रात्री एका ग्लासात बडीशेप घालून ठेवावी. सकाळी गाळून ते पाणी प्यावे.
अननसाचे सेवन अनियमित मासिक पाळी नियमित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते.
या व्यतिरिक्त कच्ची पपईचे देखील खाऊ शकता.
 
लक्षात ठेवा की मासिक पाळी सामान्य करण्याच्या उद्देशाने कोणत्याही अन्नपदार्थाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
 
मासिक पाळी न येण्याची समस्या टाळण्याचे उपाय
मासिक पाळी न येण्याची समस्या टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैली आणि आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तुमच्या जीवनात आणि आहारात सकारात्मक बदल करून तुम्ही तुमची मासिक पाळी अनियमित होण्यापासून रोखू शकता.
 
झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करावी.
संतुलित आहार घ्यावा
पुरेश्या प्रमाणात पाणी प्यावे
डेली रूटीन फॉलो करावे
फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्स घेणे टाळावे
दारु- सिगारेट याचे सेवन टाळावे
दररोज हलका व्यायाम करावा
आपल्या वजनावर नियंत्रण ठेवावे
ताण सोडावा
ती काम करावीत ज्याने आपल्याला आनंद मिळत असेल
आहारात फळ आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा
 
कोणतीही समस्या असल्यास लगेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

दसऱ्याच्या गोडधोडासाठी बनवा घट्ट आणि मलाईदार बासुंदी; घरच्या घरी मिळेल हलवाईसारखी चव

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बाळासाठी निवडा प्रभू श्रीरामांची ही खास आणि युनिक नावे

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

पुढील लेख
Show comments