सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2023 (18:56 IST)

Take care of Towels टॉवेलची काळजी कशी घ्याल

मस्तपैकी अंघोळ केल्यानंतर घाण वास मारणारा टॉवेल हाती आला की डोकं फिरून जातं. असे टॉवेल गरम पाण्यात धुवावे आणि त्या पाण्यात अर्धा- एक कप व्हिनेगरही टाकावं.
 
जर टॉवेल ब्राइट आणि कलरफुल ठेवायचा असेल तर तो पहिल्यांदा धुताना व्हिनेगर वापरा. त्यानंतर दिलेल्या सूचनांप्रमाणे वाळवा.
 
नेहमी टॉवेल वापरल्यानंतर लगेच उन्हात वाळवावा.
 
जर नव्या टॉवेलमधून फायबर निघत असेल तर तो टॉवेल लागोपाट दो-तीन वेळा धुवा.
towel
टॉवेल धुताना खूप डिटर्जंट वापरू नये. याने टॉवेल कडक होतो.
 
सॉफ्ट आणि फ्लफी ठेवण्यासाठी टॉवेलला ड्रायरमध्ये इतर कपड्याबरोबर वाळवू नका.